उदय सावंत/वाळपई
रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी कधीकधी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (hole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. अनेकदा रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बॅंकांचा सहभाग असतो.
आज रक्तदान दिवस. यामुळे समाजाची एका वेगळय़ा अर्थाने सेवा करणारे रक्तदाते यांच्या गौरवाचा दिवस .यामुळे सत्तरी तालुक्मयात गेल्या अनेक वर्षापासून दरवषी सातत्याने व गरज पडेल तेव्हा रक्तदान करणारी मंडळी मोठय़ा प्रमाणात आहेत .त्यातील अत्यंत हरहुन्नरी व समाजासाठी एकरूप होऊन रक्तदान करणारे वाळपई शहरातील नामांकित टेलर तथा सर्पमित्र प्रदीप गंवडळकर यांनी आतापर्यंत 36 वर्षे रक्तदान करीत आहेत. .वाळपईचे नामांकित डॉक्टर अशोक आमशेकर यांनी आपल्या वाढदिनी 19 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्याची एक वेगळी परंपरा सुरू केली .त्यापासून सत्तरी तालुक्मयात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची एक वेगळी चळवळ निर्माण झाली .या चळवळीच्या माध्यमातून आज शेकडो नागरिकांना याचा खऱया अर्थाने फायदा झालेला आहे. एकेकाळी रक्ताची गरज भासणे म्हणजे अत्यंत वेगळय़ा संघर्षाला सामोरे जाण्याची भीती असते. आज मात्र रक्तदान करण्याची चळवळ विकसित होत असल्यामुळे सहजपणे रक्तदाता रक्तदान ठिकाणापर्यंत पोहोचू शकता व यामुळे एखाद्याचा जीव वाचत असतो .यामुळे प्रदीप गवडंळकर याची सारखी व्यक्ती खरोखरच रक्तदानाच्या माध्यमातून एक प्रकारे ईश्वरच असल्यास चुकीचे ठरणार नाही.
आपल्या रक्ताच्या माध्यमातून जर कुणाचा जीव वाचत असतो तर तीच खरी ईश्वरसेवा असे आपण समजतो .यामुळे जेव्हा जेव्हा रक्तदानाची गरज भासते तेव्हा तेव्हा आपण रक्तदान करून ही ईश्वर सेवा साध्य करण्याचा प्रयत्न करीत आसतो असे ते सांगतात. गेली तीस वर्षे तरी आपण रक्तदान करीत असलो तरी अंदाजे 200 पेक्षा जास्त वेळा रक्तदान झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. डॉक्टर आमशेकर यांच्या वाढदिनी आपण नित्यनियमाने रक्तदान करीत असतो. मात्र मध्यंतरी जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा तेव्हा आपण लक्ष दान केलेले आहे.
बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.
अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्मयता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱया मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱया कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ 300 मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण 36 तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण 2 ते 3 आठवडय़ांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
ब्लड बॅंकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त 4-5 आठवडय़ांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.
रक्तदानामुळे प्रत्येक वषी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठय़ा सर्जरिंमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.
या देशात 120 कोटी लोकसंख्या असूनही केवळ 74 लाख ते 1 कोटी 20 लाख लिटर रक्त संकलित होते.
रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात 15 ते 20 टक्के आहे.
भारतात केवळ 0.6 टक्के लोक रक्तदान करतात









