अरुण डोंगळे व संत बाळूमामा ट्रस्टचा उपक्रम
सरवडे प्रतिनिधी
गोकुळ दुध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण डोंगळे चँरिटेबल ट्रस्ट व संत बाळूमामा देवालय व फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ३२नवदांपत्याचे विवाह संपन्न झाले.अरुण डोंगळे व त्यांचे कुटुंबीय १६ वर्षे हा उपक्रम राबवित आहेत.
या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधुवरांना मंगळसूत्र, पेहराव, संसार उपयोगी भांडी भेट देण्यात आली. शासनाने शेतकरी वधुपित्यास १० हजार रुपये व मागासवर्गीय वधुपित्यास २० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात येणार आहे.विवाह सोहळ्यासाठी अक्षता, पौराहित्य करण्यासाठी भटजी,वधुवरांना हार व वऱ्हाडी मंडळीसाठी भोजन आदिंची व्यवस्था ट्रस्ट मार्फत करण्यात आली होती.
विवाह सोहळ्यास गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे,गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील,बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, संचालक किसन चौगले, शशिकांत पाटील, ए डी पाटील, अर्जुन आबिटकर, राजेंद्र पाटील,उमेश भोईटे बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, रमेश वारके, राजाराम साठे, बी. आर. पाटील,विश्वनाथ पाटील, सुनिल कांबळे, सरपंच विजय गुरव,समाज कल्याण अधिकारी सुरेखा डवर,सविता शिर्के,पांडुरंग चव्हाण,उदय पाटील, मुकुंद पाटील यांच्यासह वधुवरांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. स्वागतअभिषेक डोंगळे, प्रास्ताविक राजेंद्र चौगले,सूत्रसंचालन सुहास डोंगळे यांनी केले.धनाजी पाटील यांनी आभार मानले.