प्रतिनिधी/ रत्नागिरी
परतीच्या पावसाने जिह्यातील 35 हजार हेक्टरवरील भातशेती पीकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आह़े भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही जिह्यात सुरु झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आह़े
जिल्ह्यात सुमारे 66 हजार हेक्टरवर भातशेती करण्यात आली होत़ी तर 9 हजार हेक्टरवर नाचणी पीक घेण्यात आले होत़े मात्र परतीच्या पावसामुळे जिह्याला झोडपल्यामुळे काढणी योग्य भातशेती वाया गेल़ी जिह्यातील जवळपास 35 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े कृषी विभागामार्फत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून 325 कृषी सहाय्यामार्फत पंचनामे करण्यात येत आहेत़ जिह्यामध्ये या आधी जून ते ऑगस्टदरम्यान अतिवृष्टी झाली होत़ी यामध्ये जिल्हय़ातील 17 हजार भातशेती क्षेत्र बाधित झाले होत़े आता पुन्हा परतीच्या पावसाने शेतकऱयाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आह़े दरम्यान नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार आह़े नुकसान झालेल्या शेतकऱयांनी स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये नुकसानीबाबत नोंद केल्यास कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांना पंचनामे करणे सोपे जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी सांगितल़े









