वृत्तसंस्था/ बेंगळूर
आगामी होणाऱ्या हॉकी फाईव्ह विश्वचषक महिलांच्या हॉकी स्पर्धेसाठी त्याचप्रमाणे रांचीत होणाऱ्या महिलांच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने सराव शिबिर घेण्याचे निश्चित केले असून या शिबिरासाठी 34 महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे. सदर शिबिर बुधवारपासून सुरु होत आहे.
अलिकडेच भारतीय महिला हॉकी संघाने स्पेनचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये पाच देशांची हॉकी स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने बेल्जियम, जर्मनी, आयर्लंड आणि यजमान स्पेनविरुद्ध सामने खेळले होते. दरम्यान ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रांचीत 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश राहिल. अ गटामध्ये जर्मनी, जपान, चिली आणि झेक प्रजासत्ताक तर ब गटात भारत, न्यूझीलंड, इटली आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारतीय महिला हॉकी संघ 24 ते 27 जानेवारी दरम्यान ओमानमधील मस्कत येथे होणाऱ्या हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धेत भाग घेईल.
भारतीय महिला हॉकी संघ : गोलरक्षक सविता, ई. रजनी, के. बिचूदेवी, बन्सरी सोळंकी, बचाव फळी – दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदीता, इशिका चौधरी, अक्षता ढेकळे, ज्योती छात्री, महिमा चौधरी, मध्यफळी – निशा, सलिमा टेटे, सुशिला चानू, ज्योती, नवजोत कौर, मोनिका, मारीयाना कुजूर, सोनिका, नेहा, बलजित कौर, रिना खोकर, वैष्णवी फाळके, अजमिना कुजूर, आघाडी फळी-लालरेमसियामी, नवनीत कौर, वंदना कटारिया, शर्मिला देवी, दीपिका, संगीता कुमारी, मुमताज खान, सुनेलिता टोपो, ब्युटी डुंगडुंग









