-जिल्हा आरोग्याधिकारी शितलकुमार जाधव यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
कोवीड-19 च्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आज, बुधवारी सोलापूर शासकीय रुग्णालयात जिल्हासाठी 34 हजार 184 कोवीडशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी शितलकुमार जाधव यांनी दिली.
कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता शनिवारी 16 जानेवारी रोजी लसीकरणाचा पहिल्या टप्पा प्रारंभ होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांसाठी 34 हजार 184 कोवीडशिल्ड लस सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडिया या कंपनीची लस पुण्याहून सोलापुरात बुधवारी रात्री दाखल झाली.
या लसीसाठी 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये ठेवावी लागणार आहे. त्यासाठी पूर्व तयारी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आली असून जिल्हा लस भांडार येथे ठेवण्यात येणार आहे. लसीचे शितसाखळी अबाधित ठेवून लस जिह्यातील केंद्रावर व लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्याकरिता विविध केंद्रावर कर्मचार्यांची नियुक्ती करून योग्य ते नियोजन केले आहे. 16 जानेवारी रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्थामध्ये लसीकरणाचा शुभारंभ होणार असल्याचे आरोग्याधिकारी जाधव यांनी सांगितले.
Previous Articleकोपार्डे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार
Next Article भुयारी मार्गाद्वारे घुसखोरीचा डाव उघड









