चेन्नई:
दागिन्यांच्या क्षेत्रात कार्यरत कल्याण ज्वेलर्सने तिसऱ्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून महसुलात 33 टक्के वाढ नोंदवली आहे. भारतातून व्यवसायातून कंपनीने 40 टक्के महसुलात वाढ केली आहे.
मध्य आशियातून शोरुममधून महसुलाचे प्रमाण 6 टक्के इतके कमी राहिले आहे. जे मागच्या वर्षी याच अवधीत 13 टक्के इतके होते. याच तिमाहीत कल्याण ज्वेलर्सने जवळपास 22 नवी शोरुम्स भारतात सुरु केली आहेत.









