वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या केंद्रामध्ये (साई) 9 एप्रिल ते 13 मे दरम्यान वरिष्ठ महिला हॉकीपटूंसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी शनिवारी हॉकी इंडियाने 33 सदस्यांची घोषणा केली आहे. आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी तसेच चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हे शिबिर महिला हॉकीपटूंना महत्त्वाचे राहील.
या शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या 33 महिला हॉकीपटूंच्या कोअर संभाव्य गटामध्ये गोलरक्षक सविता, ई. रजनी, बिचू देवी खेरीबाम, बासुरी सोळंकी, त्याचप्रमाणे दीप ग्रेस एक्का, गुरुजित कौर, निकी प्रधान, उदिता, इशिका चौधरी, अक्षता आबासा ढेकळे, ज्योती क्षेत्री, महिमा चौधरी, निशा, सलीमा टेटे, सुशीला चानू, ज्योती, नवज्योत कौर, मोनिका, मारियाना कुजूर, सोनिका, नेहा, बलजीत कौर, रिना खोकर, वैष्णवी फाळके, अजमीना कुजूर, लालरेमसियामी, नवनीत कौर, वंदना कटारिया, शर्मिला देवी, दीपिका, संगीता कुमारी, मुमताज खान, सुनेलिता टोप्पो यांचा समावेश आहे. या शिबिरामध्ये अखिल भारतीय महिला हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्कोपमन तसेच इतर प्रशिक्षकांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.









