पाताळाचा मिळाला पत्ता
तुर्कस्तानातील एका मंदिरात पुरातत्व विभागाच्या उत्खननात एक प्राचीन कॅलेंडर आणि ब्रह्मांडाचा नकाशा मिळाला आहे. दगडांनी कोरण्यात आलेले चित्र 3200 वर्षे जुने असल्याचे मानले गेले आहे. यात एका ‘अंडरवर्ल्ड’चा उल्लेख असून जो भूगर्भात आहे. फ्रान्सचे पुरातत्वतज्ञ आणि इतिहासकार चार्ल्स टेक्सियर यांनी 1834 मध्ये संबंधित मंदिराचा शोध लावला होता.

चुनादगडावर कोरण्यात आलेल्या आकृतीत 90 विविध प्राणी, सैतान आणि देवाची प्रतिमा दिसून येते. याच्या शोधानंतर ब्रह्मांडाच्या या चित्रात पृथ्वी, आकाश आणि एक पाताळ असल्याचे समजण्यास 200 वर्षे लागली आहेत. एका भिंतीवर सूर्यदेवता आणि वादळाच्या देवीचे चित्र कोरण्यात आले आहे.
यात देवतांना इतरांपेक्षा वरचे स्थान दर्शविण्यात आले आहे. दुसरीकडे पश्चिमेच्या दिशेने असलेल्या भिंतीवर चंदकोराचे विविध टप्पे असून यातून जन्म आणि मृत्यूचा फेरा दर्शविण्यात आला आहे. एका आकलनानुसार संबंधित काळात 17 देवता असल्याचे मानले जात होते. एका खोलीत पाताळसंबंधी चित्रे कोरण्यात आली आहेत.









