मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया‘च्या जयघोषासोबत पारंपरिक वाद्यांचा नाद ऐकू आला
कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यायी मार्गावरील मिरवणुकीतून विधायकतेचा संदेश देण्यात आला. अनंतचतुर्थदशी दिवशी झालेल्या मुख्य मिरणुकीत सायंकाळनंतर साऊंड सिस्टमचा गोंगाट, गर्दीतून चेंगराचेंगरी सदृष्य स्थिती, पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त व तणाव तर दुसरीकडे पर्यायी मार्गावर पारंपरिक वाद्यांचा निनाद, मोरयाचा गजर, महिलांचा उत्स्फुर्त सहभाग अशी पर्यापुरक मिरवणुक पार पडली.
ही दोन्ही चित्रे भिन्न असली तरी मुख्य मिरवणुकीत सायंकाळनंतर होणारा गोंगाट, साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर नाचणारी तरूणाई कोल्हापूरच्या संस्कृतीला कोणत्या दिशेने घेवून जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यायी मार्गावरून तब्बल 16 तास चाललेल्या या भव्य मिरवणुकीत 315 गणेश मंडळांनी साउंड सिस्टिमला फाटा देत पर्यावरणपुरकतेचा संदेश दिला.
कोल्हापूरला ‘एक गाव, एक गणपती’ व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श घालून देण्याची परंपरा आहे. यंदा 315 मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी साउंड सिस्टिमचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर केला. यामुळे मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया‘च्या जयघोषासोबत पारंपरिक वाद्यांचा नाद ऐकू येत होता.
या मंडळांनी पर्यायी मार्गांचा अवलंब केल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील गोंगाट कमी झाला आणि मिरवणुकीला अधिक शांततामय स्वरूप प्राप्त झाले. यामुळे कोल्हापूरच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
साऊंड सिस्टमचा टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते, त्याला अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत पर्यायी मार्गावरून मिरवणुक काढली. यामुळे पर्यावरणपूरकतेचा संदेशही पुढे आला. मिरवणुकीत भव्य गणेशमूर्तींनी भाविकांचे लक्ष वेधले. दुसरीकडे मात्र, मुख्य मिरवणुकीत सायंकाळनंतरचे चित्र वेगळेच होते. आवाजाची मर्यादी ओलांडून साऊंड सिस्टमचा दणदणाट सुरू होता.
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक उत्सवाचा नजारा पहायला मिळाला. ही सांगड घलत सायंकाळनतंर होणारा गोंधळ रोखण्यासाठी विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेचे स्वागत व पोलिसांचा बंदोबस्त कोल्हापूर महानगरपालिकेने यंदा गणेश मंडळांचे पान–सुपारी आणि पुष्पहार देऊन स्वागत केले. प्रत्येक मंडळाला सन्मानाने सामावून घेण्याचा हा प्रयत्न मंडळ कार्यकर्त्यांनी कौतुकास्पद ठरवला.
पर्यायी मार्गावरील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्तीने परिस्थिती हाताळली आणि मिरवणूक शांततेत पार पडली. मंडळ कार्यकर्त्यांची स्वयंशिस्त कोल्हापूरच्या गणेशोत्सवात मंडळ कार्यकर्त्यांनी दाखवलेली स्वयंशिस्त ही यंदाची विशेष बाब ठरली. प्रशासनाने ठरवून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करत मंडळांनी मिरवणूक शांततेत आणि नियोजनबद्ध रीतीने पार पाडली.
ध्वनिप्रदूषण आणि लेसर किरणांबाबत न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी केले होते, आणि मंडळांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अशीच स्थिती मुख्य मिरणुकीत होणे गरजचे आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश गणेशोत्सवात भक्ती, परंपरा आणि पर्यावरणपूरकतेचा अनोखा संगम ठरला.
315 मंडळांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून साउंड सिस्टिमला फाटा दिला, तर पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीला सांस्कृतिक रंगत आणली. काही अडचणी आल्या, तरी मंडळ कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्तीने परिस्थिती हाताळली. पर्यायी मार्गावरील मिरवणुकीने आपली सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्यो जपत पर्यावरणपूरकतेचा संदेश दिला.








