ऑनलाईन टीम / पुणे :
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमइडी) तर्फे 31 डिसेंबर रोजी रस्ता सुरक्षा, कोविड सुरक्षा मोहीम आखण्यात आली आहे. वाहतूक सुरक्षा आणि कोविड साथीपासून बचावाविषयक संदेश असलेली पोस्टर्स शहरातील विविध भागात वाटली जाणार आहेत.
आयएमइडी चे संचालक आणि भारती विद्यापीठाचे व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. विजय फाळके यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
तिचाकी आणि चार चाकी वाहनांना ही पोस्टर्स वितरित केली जाणार आहेत. या मोहिमेचा प्रारंभ अलका टॉकिज चौकात सिग्नल जवळ 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून सहभागी होतील.
दर वर्षी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा विषयक जागृती महाविद्यालयातर्फे आयोजित केली जाते. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.








