ऑनलाईन टीम
mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज महत्त्वाची घोषणा केली आहे. 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. स्वप्नील लोणकरची आत्महत्या वेदनादायी आहे. पुन्हा ही वेळ राज्यातील कुठल्याही तरुणावर येऊ नये असा सरकारचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सरकारने एमपीएससीचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांशी चर्चा करुन या विषयासंर्भात काय करु शकतो यावर चर्चा केली आहे. आता 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार आहोत, अशी माहिती पवार यांनी दिली.
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरून विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट वाचली. तर सुधीर मुनगंटीवार यांनी ४३० एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याचे सांगितले. तसेच स्वप्निल लोणकरच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी केली.
Previous Articleअनिल देशमुख मधे बोल्यामुळेच जेलमध्ये चालले – सुधीर मुनगंटीवार
Next Article “सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही”








