दिग्गज ओलासह 4 कंपन्यांचा समावेश : सरकारच्या सूचनेकडे कंपन्यांचे दुर्लक्ष
नवी दिल्ली :
देशातील पहिल्या 4 इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांनी अद्यापही ग्राहकांना 306 कोटी रुपये परत केलेले नाहीत. या कंपन्यांमध्ये ओला इलेक्ट्रिक, अॅथर एनर्जी, टीव्हीएस मोर्ट्स आणि हिरोमोटोकॉर्प यांचा समावेश आहे. अॅडॉप्शन अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (एफएएमइ-2) अंतर्गत सबिसिडीचा दावा करण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या स्कूटरच्या किमती कमी ठेवल्याचा आरोप आहे, परंतु चार्जर आणि सॉफ्टवेअरच्या नावाखाली ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारले गेले होते, असे दिसून आले आहे. इतकेच नाहीतर नंतर कंपन्या सॉफ्टवेअर अपडेटच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे वसुल करत होत्या. सबसिडीच्या नियमानुसार पाहता या कंपन्या चार्जरसाठी वेगळे पेमेंट घेऊ शकत नाहीत.
आतापर्यंत 10 कोटी रुपये परत केले
सरकारच्या सुचनेनंतर चार कंपन्यांनी ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाला चार्जरच्या किंमतीच्या 100 टक्के परतावा देण्याची सूचना केली होती, परंतु आतापर्यंत ग्राहकांना 10 कोटी रुपये परत करण्यात आल्याचे समजते. आता कंपन्यांचे म्हणणे आहे, की ग्राहकांचे बँक तपशील उपलब्ध नसल्यामुळे परतावा परत करण्यास विलंब होत असल्याची माहिती आहे. यामध्ये अॅथर एनर्जीकडून सर्वाधिक रक्कम ग्राहकांना देणे बाकी आहे.
…या ग्राहकांना मिळणार परतावा
-ज्या गाहकांनी 2019 ते 30 मार्च 2023 या आर्थिक वर्षात ओलाएस1 प्रो मॉडेल खरेदी केले आहे त्यांना कंपनी परतावा देणार
-मे 2022 ते मार्च 2023 दरम्यान ज्या ग्राहकांनी आयक्यूब खरेदी केली त्यांना टीव्हीएस पैसे परत देणार आहे.
-हिरोमोटो कॉर्प मार्च 2023 पर्यंत विदा प्लस आणि विदा व्ही 1 मॉडेल्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चार्जरचे पैसे परत करणार आहे.









