प्रतिनिधी/ बेळगाव
हुनशाळ (ता. गोकाक) येथे पोलिसांनी शनिवारी 34 बॉक्स बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. यासंबंधी घटप्रभा पोलीस स्थानकात कर्नाटक अबकारी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी 34 बॉक्समधून 3 हजार 64 पाऊच जप्त केले आहेत. एकूण 301 लिटर बेकायदा दारूसाठा ताब्यात घेण्यात आला असून त्याची किंमत 1 लाख 18 हजार रुपयांइतकी होते.









