कोल्हापूर :
थोरला दवाखाना म्हणून राज्यासह परराज्यात नावलौकीक असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयात (सीपीआर) कान, नाक, घशाच्या दीड वर्षात तब्बल 3201 मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सध्या नव्याने विकसित झालेल्या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरमुळे उपचारात सुलभता निर्माण झाली आहे.
मागील दहा वर्षात सीपीआरमध्ये कान, नाक, घशाच्या 16 हजार 775 शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. खाजगी दवाखान्यात महागड्या असणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. सीपीआर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांचा आधारवड ठरला आहे. सध्या, कान, नाक, घसाशास्त्र विभागात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया माफक व मोफत होत आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी केले आहे.
सध्या, कान, नाक, घसा विभागात थॉयरॉईड हायनोप्लास्टी स्वरयंत्राचे, स्वरयंत्ताच्या विविध शस्त्रक्रिया, दुर्बिनीदद्वारे नाकाची व सायानसची शस्त्रकिया तसेच कानाच्या जटील शस्त्रक्रिया तसेच अन्न नलिका व श्वास नलिकामधून विजातीय पदार्थ काढण्याच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
दररोज दिडशे ते दोनशे रूग्ण तपासणीसाठी येतात. महिन्याला 200 ते 250 दरम्यान गंभीर सर्वसाधारण शस्त्रक्रिया होतात. डॉ. अजित लोकरे, विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. वासंती पाटील व दोन सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्नेहल सोनार, डॉ प्रियांका वाटे यांची टीम उपलब्ध आहे.
- लवकरच कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रियेची सोय
सीपीआर हॉस्पीटलमध्ये कान, नाक, घसाशास्त्र विभाग अद्ययावत झाला असून येथे मॉडयुलर ऑपरेशन थिएटरची सोय करण्यात आली आहे. यामुळे गरीब व गरजूंना माफक दरात दर्जेदार उपचार मिळत आहेत. भविष्यात कर्णबधिर मुलासाठी कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
-डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- गरजूंनी लाभ घ्यावा
सीपीआरमधील कान, नाक, घसाशास्त्र विभागात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. त्वरित उपचारामुळे विभागाने जिल्ह्याचे लक्ष केंद्रित केले आहे. गरीब व गरजू रूग्णांवर माफक व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. याचा लाभ घ्यावा.
-डॉ. अजित नोकरे, प्राध्यापक व विभागप्रमुख, कान, नाक, घसाशा विभाग, सीपीआर
- गेल्या दहा वर्षात झालेल्या शस्त्रक्रिया अशा :
वर्ष गंभीर सर्वसामान्य एकूण
2015 588 531 1119
2016 620 560 1180
2017 633 744 1377
2018 522 725 1247
2019 668 1264 1932
2020 157 269 426
2021 460 920 1380
2022 626 1810 2436
2023 658 1819 2477
2024 274 1537 2111
2025(जूनपर्यंत) 313 777 1090
एकूण : 5519 10,956 16,775








