नवी दिल्ली
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया यांनी नुकतीच पीएलआय (उत्पादन प्रोत्साहन योजना) अंतर्गत 300 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. एअर कंडिशनरच्या सुट्ट्या भागासाठी तसेच कॉम्प्रेसरच्या निर्मितीसाठी वरील गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती आहे. सरकारच्या पीएलआय योजनेंतर्गत जवळपास 300 कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. एलजीच्या एअरकंडिशनर करिता कंपनी 65 टक्के इतके सुटे भाग भारतातच तयार केलेले वापरते, असेही सांगितले जात आहे. अलीकडेच ग्रेटर नोएडामध्ये एलजीने कॉम्प्रेसर निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या कारखान्यामधून वार्षिक तत्त्वावर 10 लाख कॉम्प्रेसरची निर्मिती होऊ शकणार आहे.









