नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांसाठी क्षमतेच्या 30 ते 50 टक्के चाहत्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे, ही स्पर्धा यंदाही प्रेक्षकांविना खेळवली जाणार नाही, हे निश्चित झाले. यापूर्वी, प्रेक्षकांना प्रवेश द्यायचा का, याचा निर्णय आयपीएल कार्यकारिणीने संयुक्त अरब अमिरात मंडळावर सोपवला होता. या स्पर्धेसाठी विविध संघातील खेळाडू 3 ते 4 आठवडे आधीच येथे दाखल होणे अपेक्षित आहे. प्राथमिक रुपरेषेनुसार, ही स्पर्धा दि. 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.









