आकारणीला बँकांना सर्वोच्च न्यायालयाची अनुमती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
व्रेडिट कार्डाच्या थकबाकीवर 30 टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त व्याज लावण्यास सर्वोच्च न्यायालयाने बँकांना अनुमती दिली आहे. यासंबंधी 16 वर्षांपूर्वी राष्ट्रीय ग्राहक समस्या निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फिरविला आहे. आयोगाने अशा प्रकारे व्याज लावणे ही अयोग्य कृती ठरविली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बँकांना दिलासा मिळाला आहे.
न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ग्राहक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर आहे. बँकांच्या अधिकारातील तो अवैध हस्तक्षेप आहे. बँकांना नियमानुसार पेमेंट करणे हे क्रेडिट कार्डधारकाचे कर्तव्य असून ते त्याने केले नाही, तर बँकांना त्याच्यावर 30 टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक व्याज आकारण्याची मुभा आहे. बँकांवर या संदर्भात निर्बंध घालणे व्यवहारिदृष्ट्या योग्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
बँकांची चूक नाही
व्रेडिट कार्ड देताना बँकांनी यासंबंधीच्या अटी कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे दिलेल्या असतात. त्या योग्य प्रकारे पाहून आणि त्यांचा अर्थ समजून घेण्याचे उत्तरदायित्व व्रेडिट कार्ड धारकाचे आहे. बँकांनी या संदर्भात कार्डधारकाची कोणत्याही प्रकारे फसवणूक केल्याचा पुरावा नाही. तसेच बँकांनी कोणत्याही प्रकारे अटी ग्राहकापासून लपविल्या आहेत, असेही दिसून येत नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली, हे क्रेडिटकार्डधारकाचे म्हणणे ग्राह्या मानता येत नाही. बँकिंग नियमन कायद्यानुसार जे अधिकार बँकांना देण्यात आले आहेत, ते त्यांच्यापासून हिरावून घेता येणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती न्यायालयाने निर्णयात केली आहे.
एकांगी बदल करता येणार नाही
क्रेडिट कार्ड धारकावर ज्या अटी घालण्यात आलेल्या असतात, त्यांच्यामध्ये एकतर्फी पद्धतीने किंवा कार्ड धारकाची अनुमती घेतल्याशिवाय बदल करण्याचा अधिकार बँकांना नाही. अशी कृती बँकांनी केल्यास ती अवैध ठरविण्याचा अधिकार ग्राहक आयोगाला आहे. तथापि, बँकांनी क्रेडिट कार्ड धारकाशी करार करताना त्याच्यासमोर सर्व अटी आधीच मांडल्या असतील आणि या अटी मान्य करुन जर धारकाने व्रेडिट कार्ड घेतले असेल तर बँकांची कोणतीही चूक आहे, असे म्हणता येणार नाही. क्रेडिट कार्ड धारकाला दुहेरी लाभ दिला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने आपल्या 20 डिसेंबरच्या निर्णयात स्पष्ट केले आहे.









