दोन महिला गंभीर, विद्यार्थ्यासह अनेक प्रवासी जखमी
प्रतिनिधी/ फेंड़ा
भिण्णे-बेतोडा येथे प्रवासी बसला झालेल्या स्वयंअपघातात बस रस्त्यावरून कोसळून सुमारे 3 मिटर खोल शेतात उलटली. चालकासह एकूण 30 प्रवाशी जखमी झाले असून गंभीर जखमी झालेल्या सुजाता नाईक (55, सातेरीमळ) व अमिता बोमी गावडे (48, शिगणेव्हाळ निरंकाल) या दोघां महिलांना बांबोळी येथील गोमेकॉत अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल शनिवारी सकाळी 7.15 वाजण्याचा सुमारास हा अपघात घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वालंकीनी नामक खासगी प्रवासी बस जीए 01 डब्ल्यू 4190 दाभाळहून निरंकाल-बेतोडामार्गे फोंड्याच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला. भिण्णे-बेतोडा येथील धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा गेल्याने सुरक्षाकठडा नसल्याने रस्त्यावरून उजव्या बाजूने कोसळून बस थेट 3 मिटर खोल शेतात उलटली. बस कोसळून उलटण्याचा अंदाज येताच प्रवाशांचा एकच गेंधळ उडाला. यावेळी बसमध्ये 14 विद्यार्थी, महिला, वृद्धासह एकूण 35 प्रवाशी होते. येथील ग्रामस्थांनी महत्वाचे मतदकार्य करताना शिडिच्या सहाय्याने प्रवाशांना रस्त्यावर काढले. त्यानंतर 108 रूग्णाहिकेने जखमींना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. दोन महिलां प्रवाशी बसच्या तुडलेल्या सीटमध्ये अडकल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. हाता पायाला दुखापत, विद्यार्थ्याना डोक्याला इजा, काहीचे हात फ्रक्चर झालेले असून काहीं जखमीना उपजिल्हा इस्पितळात निरीक्षणासाठी ठेवून काही किरकोळ जखमींना एक्स्रे काढल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
जखमीमध्ये 14 विद्यार्थ्यासह, 4 जण जत्रेतील फेरीवाल्याचा समावेश
जखमी झालेल्यामध्ये अनुष्का गावडे (19,निरंकाल), मीना गावकर (21, कळसई), सलोनी सनदी (19,दाभाळ), सविता अनिल गावकर(43,दाभाळ), साईशा सतरकर (16,बेतोडा), करूणा गावडे(17,निरंकाल), सोनाली सतरकर (17,निरंकाल), फिलामेंत डिसौजा (22, कळसई), श्रृतीका नाईक (24, निरंकाल), अश्विनी सतरकर(50,निरंकाल), दिप्ती गावडे (17, दाभाळ), सुमती गावकर(60, निरंकाल), रविजा नाईक (19), गोकुळदास बोरकर, सविता जयराम कोलेकर (34, गवळवाडा), गौतम नाईक (25, करमणे),ईशा कुट्टीकर (19, वाघोण), सोनिया शेटकर (17, कुंभारवाडा-निरंकाल), रविजा नाईक (19, सातेरीमळ -निरंकाल), सुनिल गावकर (19, निरंकाल), नविता बोरकर (21, निरंकाल), संजना नाईक (17, निरंकाल), ट्विन्कल नाईक (19, निरंकाल), ,लक्षीता गावकर (धावकोण) तसेच कळसई येथे उत्सवात खेळण्dयाचे दुकान लावणारे फेरीवाले राजेश साहनी(48,पणजी), विनोद गायनझा (29, पणजी), अभिजीत साहनी (28, पणजी), राधेशाम साहनी (50,पणजी) अशी जखमींची नावे आहेत. रस्त्याच्या बाजुला संरक्षक कठडा नसल्यामुळे हा मोठा अपघात झाल्याची प्रतिक्रिया संतत्प ग्रामस्थांनी दिली. मागील काही वर्षापुर्वी प्रवासी व दुचाकी अपघातात एका स्थानिक युवकाला जीव गमवावा लागला होता. ग्रामस्थांच्या मागणीनंतरही दोन्ही बाजूने शेत असलेल्या साकवाला वाहनांच्या सुरक्षतेसाठी संरक्षक कठडा उभारण्याविषयी हालचाली पंचायतीने केलेल्या नाहीत.
नाटकातील फेरीवालेही सापडले अपघातात
कळसई येथे जत्रोत्सवात पणजी येथील काही फेरीवाल्यानी खेळण्याची दुकान थाटली होती. दुसऱ्या दिवशी गणनाथ देवस्थानजवळ जत्रोत्सवात ती हलविण्यात येणार होती. दिवसा काही काम नसल्याने सकाळी ते आपल्या पणजी येथील खोलीवर होऊन रात्री परतणार होते.
फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. वाहनाचा भार सोसणारी लोखंडी पट्टी अचानक तुटल्यामुळे वाहनाचा ताबा जाऊन बस उलटल्याची माहिती बसचालकांने दिली आहे. तसेच सदर बसचा नियमित चालक काल ड्युटीवर नसल्यामुळे गौतम हा बस चालविण्यासाठी आला होता. वळण व रस्त्याची माहिती नसल्यामुळे चालक गेंधळला उडाला? की वाहन नादुरूस्त झाल्याने अपघात झाला? याची माहिती मिळू शकलेली नाही. गंभीर जखमींना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी बसचालक गौमत रामा नाईक (25, बाबुली-करमणे) याच्याविरोधात भां.दं.सं. 279, 337, 338 कलमाखाली गुन्हा नेंदविण्यात आला असून हवालदार कृष्णनाथ नार्वेकर अधिक तपास करीत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार तथा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात भेट देऊन जखमींची विचारपुस केली. अपघाताचे नेमके कारण समजून घेतल्यानंतर भविष्यात असे अपघात घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
अपघातानंतर उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या सर्व जखमींवर उपचार करण्यासाठी इस्पितळाच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी कॅज्युएलीटीमध्ये धाव घेत मोलाचे सहकार्य केले.









