रस्ताकाम त्वरित न झाल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
वार्ताहर /कणकुंबी
जांबोटी-रामापूरपेठ गावच्या प्रवेशद्वारापाशी रस्ता पूर्णपणे खराब होऊन देखील दुरुस्तीसाठी चालढकल होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. सात कि. मी. रस्ता पूर्ण होऊन केवळ 30 मीटर लांबीच्या रस्त्याचे काम शिल्लक राहिल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जांबोटी ते चापोली रस्त्याचे काम नुकतेच काही महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून केंद्र व राज्य सरकारने सदर रस्त्यासाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर केला होता. 5 मीटर ऊंदीचा रस्ता मंजूर केला होता. निविदाही काढल्या. परंतु वनखात्याच्या तक्रारीमुळे शेवटी तीन मीटर ऊंदीचा रस्ता करण्यासाठी परवानगी देण्यात आली. अडीच कोटी ऊपयांचा निधी खर्च करून रस्ता केला. उर्वरित अडीच कोटींचा निधी सरकारला परत गेला. जांबोटी विश्रामगृहाकडून रस्त्याच्या कामाला सुऊवात करण्यात आली. परंतु जांबोटी बसस्टॅन्ड ते विश्रामधाम हा रस्तासुद्धा पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे रस्त्यासाठी ग्रा.पं. निधी मंजूर करू शकत नाही. यापैकी रामापूर पेठ गावात प्रवेश करताना म्हणजे मनोहर डांगे व मोहमदअली डंबलकर यांच्या घरापासून ते ग्रा.पं.पर्यंतचा रस्ता कंत्राटदाराने पूर्ण केला आहे. केवळ 30 मीटर रस्त्याचे काम शिल्लक आहे. त्यासाठी जवळपास दोन लाख ऊ. निधीची गरज आहे. परंतु या रस्त्यासाठी कुणाचीही मानसिकता दिसून येत नाही. रामापूर पेठमधील डंबलकर यांच्या घरापासून ते जांबोटी को-ऑप. सोसायटीपर्यंतचा 30 मीटर रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यासाठी ग्रा.पं. निधी खर्च करू शकत नाही, कंत्राटदार स्वत:चे पैसे घालू शकत नाही आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ निधी देऊ शकत नाहीत. अशा या तिहेरी अडचणीत हा रस्ता अडकलेला आहे. नागरिकांनी कंत्राटदाराला विनंती केली असता कंत्राटदाराने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी निधी दिला तर रस्त्याचे काम करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून आठवड्यात रस्ता केला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा येथील युवावर्गाने दिला आहे.









