जगातील सर्वोत्तम बास्केटबॉलपटू मानल्या जाणाऱया लेब्रॉन जेम्स याच्या जर्सीचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. त्याच्या जर्सीला तब्बल 30 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लागली. ही जर्सी जेम्सने 2013 च्या एनबीए स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वापरली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दहा वर्षांनी या जर्सीचा लिलाव करण्यात आला आहे.
2020 मध्येही लेब्रॉनची आणखी एक जर्सी लिलावात विकण्यात आली होती. तिला 5 लाख 13 हजार रुपये किंमत मिळाली होती. ही जर्सी परिधान करून त्याने मायामी स्पर्धा जिंकली होती. मायकेल जॉर्डन नावाच्या बास्केटबॉलपटूला 1998 मध्ये जर्सीचा लिलाव करून 1 कोटी 10 लाख डॉलर्स मिळाले होते. कोणत्याही खेळाडूच्या जर्सीला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत होती. लेब्रॉन जेम्स याची जर्सी दुसऱया क्रमांकाची महागडी जर्सी ठरली आहे. दियागो माराडोना याची हँड ऑफ गॉड नामक जर्सी लंडन येथील लिलावात 90 लाख डॉलर्सना विकली गेली होती. गुणांकांच्या दृष्टीने लेब्रॉन जेम्स सध्या जगात दुसऱया क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी त्याला 178 गुणांची आवश्यकता आहे. मात्र, गुणवत्तेच्यादृष्टीने तो सर्वोत्तम बास्केटबॉलपटू मानला जातो.









