नवी दिल्ली :
प्राप्तीकर अधिकाऱयांना करदात्यांच्या समस्या, तक्रारींचे निवारण 30 दिवसात करण्याचे आदेश केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने (सीबीडीटी) दिले आहेत. सीबीडीटीने करदात्यांच्या समस्या जाणून त्या इमेलच्या माध्यमातून सोडवण्यासंदर्भात आवाहन अधिकाऱयांना दिले आहेत. तक्रारींवर अधिकाऱयांनी जातीने लक्ष घालून त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आदेशही अधिकाऱयांना दिले असल्याचे समजते.









