40 हजार लोकांच्या ब्रेन स्कॅनमधून आले समोर
अनिद्रा (इंसोम्निया), चिंता (एंक्झाइटी) आणि नैराश्य (डिप्रेशन)ने त्रस्त लोकांच्या मेंदूत मुख्यत्वे तीन प्रकारच्या समस्या असतात. यासंबंधीचा खुलासा नेचर मेंटल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित एका नव्या अध्ययनातून झाला आहे. या संशोधनामुळे रुग्णांवर प्रभावी उपचाराचा नवा मार्ग खुला होऊ शकतो, कारण वर्तमान उपचार पूर्णपणे उपयुक्त नाही आणि कित्येकदा लक्षणे पुन्हा दिसू लागत असतात.
या तीन असामान्यतांपैकी एक थॅलेमस छोटे असणे आहे. हा मेंदूचा एकाग्रता ा आणि स्मरणशक्तीशी निगडित हिस्सा असतो. याचमुळे यात लक्ष भटकणे आणि विस्मृतीसारख्या समस्या निर्माण करू शकतो. दुसऱ्या दोन असामान्यतांमध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या हिस्स्यांदरमयन कमकुवत संपर्क असणे आहे. यामुळे मेंदूच्या क्षेत्रांदरम्यान परस्पर संचार प्रभावित होतो. मेंदूचे बाहेरील आवरणाचे (सेरेब्रल कॉर्टेक्स) कमी क्षेत्रफळ स्मरणशक्ती आणि भाषेशी निगडित क्षमतांवर प्रभाव पाडते. अनिद्रा म्हणजेच झोप न येणे किंवा वारंवार झोप मोड होणे, पूर्वीपासुन मनोरुग्णांशी संबंधित मानले जाते.
संशोधकांच्या टीमने युके बायोबँक डाटाबेसद्वारे 40 हजारांहून अधिक लोकांच्या ब्रेन स्कॅनचे विश्लेषण केले. या पीडितांमध्ये कोणत्या समानता आणि कोणते फरक होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सेरेब्रल कॉर्टेक्सचे कमी क्षेत्रफळ, थॅलेमसचा छोटा आकार आणि मेंदूच्या हिस्स्यांदरम्यान कमकुवत संपर्क ही सर्व लक्षणे तीन मानसिक आजारांच्या गांभीर्याशी निगडित असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. जी लक्षणे केवळ अनिद्रा, चिंता किंवा नैराश्यात वेगवेगळी आढळून येतात, ते अनेकदा याच एमिग्डाला-हिप्पोकॅम्पस-मध्य प्रीप्रंटल कॉर्टेक्स सर्किटच्या अनेक हिस्स्यांशी संबंधित असतात. यातून हे रोग किती खोलवर जोडले गेले आहेत हे कळते आणि पुढील संशोधन आणि उपचारासाठी नवी दिशा देऊ शकतात असे वैज्ञानिकांनी सांगितले.
…तर डिप्रेशन गंभीर
काही मेंदू असामान्यता तिन्ही रोगांमध्ये सामान्य आहेत, परंतु काही केवळ एका विशिष्ट रोगात दिसून येतात. अनिद्रेचे गांभीर्य मेंदूच्या अशा हिस्स्यांच्या छोट्या आकाराशी जोडलेले आहे, जो आनंदाशी संबंधित असतो. मेंदूचे बाहेरील आवरण पातळ असण्याशी नैराश्याचे गांभीर्य जोडलेले असते, खासकरून भाषा आणि भावनांना नियंत्रित करणाऱ्या हिस्स्यांशी त्याचा संबंध आहे. नैराश्याने ग्रसत लोकांना भावना व्यक्त करणे आणि नियंत्रित करण्यास का अडचणी येतात हे यातून समजू शकते असे नेदरलँडच्या व्रीजे युनिव्हर्सिटीच्या संशोधिका एलेके टिस्सिंक यांनी सांगितले.
.यामुळे होते एंक्झाइटी
एंक्झाइटीची समस्या मेंदूचा भीती आणि धोक्याच्या भावनांना प्रोसेस करणाऱ्या हिस्सा एमिग्डाला योग्यप्रकारे प्रतिक्रिया देत नसल्यास गंभीर होते. डोपामिन, ग्लूटामेट आणि हिस्टामिन यासारख्या रासायनिक पदार्थांद्वारे मेंदूच्या हिस्स्यांमध्ये संदेशांची देवाणघेवाण देखील कमकुवत होते. परंतु हे प्रभावित हिस्से वेगवेगळे असू शकात असे टिस्सिंक यांचे सांगणे आहे.









