2021 च्या हत्येशी तिघांचे कनेक्शन, पोलिसांचा दावा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या न्यू मेक्सिकोमध्ये एका मुस्लीम युवकाची हत्या करण्यात आली आहे. या युवकाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी टार्गेटेड किलिंगचा संशय व्यक्त केला आहे. तर मागील 13 दिवसांमध्ये 3 मुस्लिमांची हत्या झाली आहे. मागील दोन आठवडय़ांमध्ये झालेल्या हत्यांचे कनेक्शन नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या मोहम्मद अहमदीच्या हत्येशी आहे. 62 वर्षीय अहमदी अफगाणिस्तान मुस्लीम होते असे अल्बूकर्कचे पोलीस प्रमुख हॅरोल्ड मेदिना यांनी सांगितले आहे. यापूर्वी 26 जुलै रोजी 27 वर्षीय मुहम्मद अफजल हुसैनची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर 1 ऑगस्ट रोजी आफताब हुसैन नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. संबंधित तिघे युवक इस्लामिक सेंटर ऑफ न्यू मेक्सिकोमध्ये जात होते अशी माहिती देण्यात आली आहे.









