श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे 3 जवान हिमस्खलनात हुतात्मा झाल्याची माहिती कुपवाडा पोलिसांकडून शनिवारी देण्यात आली. माछील सेक्टरमध्ये एका गस्ती पथकावर बर्फाचे कडे कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. बर्फात अडकलेल्या दोन सैनिकांची सुटका करून त्यांना कुपवाडा येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अन्य तिघांना वाचवण्यात यश आले नाही. हुतात्मा जवान 56-आरआर या युनिटचे असल्याचे लष्करी विभागाकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.









