44 वर्षांपूर्वी तीन मित्रांनी काहीतरी वेगळे करण्याची योजना आखली आणि मग स्वत:च्या घरामागे जात एक रेषा तयार केली, यानंतर एका वेगळ्या देशाची घोषणा केली. 10 चौरस मीटरच्या या क्षेत्राचे नाव तिघांनी मिळून अटलांटियम साम्राज्य ठेवले आणि रितसर याचा एक ध्वजही तयार करत तो फडकविला होता. आता या देशाचे 3 हजार नागरिक आहेत. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीच्या एका उपनगरात 1981 मध्ये व्रुइकशँक नावाच्या मुलाने स्वत:च्या दोन मित्रांसोबत मिळून घरामागे एक रेषा काढत नव्या देशाची घोषणा केली होती. व्रुइकशँकने स्वत:ला या देशाचा सम्राट घोषित केले आणि अशाप्रकारे अटलांटियम नावाचा एक मायक्रोनेशन अस्तित्वात आला. व्रुइकशँकने डाक तिकीटही जारी केले, नाणी आणि बँकनोट तयार केली, राजनयिक प्रतिनिधी नियुक्त पेले आणि ध्वज तसेच चिन्हांची एक साखळी तयार केली. त्याने एक कँलेडर प्रणालीही अवलंबिली जी वर्षाला 10 महिन्यांमध्ये विभागते.
आता 80 हेक्टरमध्ये फैलाव
आता 44 वर्षांनी घराच्या मागे तयार करण्यात आलेल्या देशाची एक छोटी राजधानी देखील आहे, जी 80 हेक्टर क्षेत्रात फैलावलेली आहे. 2008 मध्ये मी सिडनीपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर 80 हेक्टर जमीन खरेदी केली. मग याला अटलांटियमची प्रशासकीय राजधानी करण्यात आले. अटलांटियमचे एक राष्ट्रगीत देखील असून त्याचे नाव याचे प्रांताच्या नावावर ठेवण्यात आल्याचे व्रुइकशँकने सांगितले आहे.
अटलांटियमच्या या राजधानीचे नाव ऑरोरा असून सम्राट बहुतांश दिवस ऑरोरा प्रांताच्या कॉनकॉर्डियामध्ये घालवितो, जेथे तो धोरणात्मक वक्तव्यांचा मसुदा तयार करतो. येथूनच सम्राट अन्य छोट्या देशांच्या नेत्यांसोबत पत्रव्यवहार करतो. अमेरिका, सिंगापूर आणि स्वीत्झर्लंडमध्ये देखील अटलांटियमचे बिगरमान्यताप्राप्त राजनयिक प्रतिनिधी आहेत.
आता हा मायक्रोनेशन 10 चौरस मीटरपासून 0.75 चौरस किलोमीटरचा झाला आहे. अटलांटियमचे क्षेत्रफळ व्हॅटिकनपेक्षा दुप्पट आहे. या देशाची संपत्ती झुडुपं अन् एक केबिन आहे. हे केबिन या देशाचे शासकीय निवासस्थान आहे. मायक्रोनेशनचे 3 हजार नागरिक 100 वेगवेगळ्या देशांशी संबंधित आहेत. परंतु यातील बहुतांश जणांनी अद्याप येथे पाऊल ठेवलेले नाही. परंतु अन्य देश अटलांटियमला मान्यता देत नाहीत, याचमुळे हे मायक्रोनेशनमध्ये मोडते.









