सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी हालचाली गतिमान
वृत्तसंस्था/ चंदीगड
चंदीगड महापौरपदावरून सर्वोच्च न्यायालयात सोमवारी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. परंतु यापूर्वीच भाजप स्वत:चे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी आम आदमी पक्षाचे तीन नगरसेवक भाजपमध्ये सामील होऊ शकतात. तीन नगरसेवक भाजपच्या संपर्कात असून कुठल्याही क्षणी ते पक्षांतर करू शकतात. अशा स्थितीत महापालिकेतील संख्याबळ बदलून जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महापौरपदाची निवडणूक पुन्हा करविण्याचा आदेश दिल्यास भाजप पूर्ण बहुमतासह स्वत:चा महापौर निवडून आणू शकणार आहे.
चंदीगडमध्ये 30 जानेवारी रोजी महापौरपदाची निवडणूक झाली होती, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी अंतर्गत ही निवडणूक लढविली होत. परंतु या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला होती. निवडणूक अधिकाऱ्याने 8 मते रद्दबातल ठरविली होती. आम आदमी पक्षाने भाजपवर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले हेते.









