अहमदाबाद:
गुजरात उच्च न्यायालयाने 2002 च्या दंगलीप्रकरणी तीन जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींना 2006 साली आणंद सत्र न्यायालयाने 2002 च्या गोध्रा येथील घटनेनंतर झालेल्या दंगलीप्रकरणी दोषी ठरविले होते. सरकारी पक्षाने साक्षीदारांनी आरोपींची ओळख कशी पटविली हे सांगितलेले नाही. तसेच साक्षीदाराने 100 हून अधिक लोकांच्या गर्दीत पाहिलेल्या प्रत्येक आरोपीच्या भूमिकेचा उल्लेख कसा केला हेही स्पष्ट केले नसल्याचे उच्च न्यायालयाने निर्णय देत म्हटले आहे.
न्यायाधीश गीता गोपी यांनी दोन याचिका स्वीकार करत हा आदेश दिला आहे. सचिनभाई हसमुखभाई पटेल आणि अशोकभाई जशभाई पटेल यांच्याकडुन दाखल याचिका आणि अशोक बनारसी भरतभाई गुप्ता यांच्याकडुन दाखल याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. या आरोपींना यापूर्वी भादंविचे कलम 149 अंतर्गत 5 वर्षांचा कारावास तसेच कलम 147 अंतर्गत 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.









