ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कंपनी कायद्याअंतर्गत नियमांचे पालन न केल्याने मागील पाच वर्षात 3.96 लाख कंपन्यांना सरकारच्या रजिस्टर ऑफ कंपनीजमधून काढून टाकण्यात आले आहे. कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली.
अनुपालनाअभावी अनेक कंपन्या बंद पडल्या का? असा प्रश्न राव इंद्रजीत सिंग यांना राज्यसभेत विरोधकांनी विचारला होता. त्यावर सिंग यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फ्रेमवर्कवर आधारित आहे आणि सीएसआर अंतर्गत समाविष्ट असलेल्या कंपन्यांना वार्षिक आधारावर एमसीए 21 रजिस्ट्रीकडे अशा कार्यांचे तपशील दाखल करावे लागतात. कंपनी कायद्याच्या कलम 248 (1) च्या तरतुदींनुसार, कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करणाऱया कंपन्यांना सरकारी यादीतून काढून टाकले जाऊ शकते.
गेल्या पाच आर्थिक वर्षांत एकूण 3,96,585 कंपन्यांना रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमधून काढून टाकण्यात आले आहे. 2017-18 मध्ये 2,34,371 आणि 2018-19 मध्ये 1,38,446 कंपन्यांच्या तुलनेत 2016-17 मध्ये एकूण 7,943 कंपन्या नोंदणीतून काढून टाकण्यात आल्या आहेत.









