वृत्तसंस्था /किश्तवाड
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड आणि दोडामध्ये शुक्रवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये शनिवारी दुपारी 2.53 वाजता भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरकडून देण्यात आली. या धक्क्यांची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी रात्रीही काही भागात सौम्य झटके जाणवल्याची नोंद झाली आहे. किश्तवाडमध्ये भूकंपामुळे दिवसातून दोनदा हादरे जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात जमले होते. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, वारंवार भूकंप होत असल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.









