बेंगळूर : राज्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थांच्या जप्तीची कारवाई गतिमान झाली असून बुधवारी बेंगळूर शहर पोलिसांनी 3 कोटी 30 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी परराज्यातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. राजूरम बिष्णोय (वय 31) आणि सुनीलकुमार (वय 21) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते दोघेही मुळचे राजस्थान येथील आहेत. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध जारी आहे.
आरोपींकडून 1 किलो 280 ग्रॅम ब्राऊन शुगर, 475 ग्रॅम अफू, 25 एलएसडी स्ट्रीप्स, 35 गॅम एमडीएमएम फाईल रोल, 3 मोबाईल, 2 दुचाकी, तीन वजनमापन यंत्रे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेंगळूर शहर मार्केट पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.









