शिक्षण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रावर विशेष लक्ष
वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरात विधानसभेत अर्थमंत्री कनुभाई देसाई यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. 2023-24 साठीचा अर्थसंकल्प मागील वर्षाच्या तुलनेत 18-20 टक्क्यांनी अधिक आहे. यंदाचा अर्थसंकल्प 3.10 लाख कोटी रुपयांचा आहे. नव्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रांकरता सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच सरकारने जनतेवर कुठल्याही नव्या कराचा भार टाकलेला नाही. अर्थसंकल्पात स्टॅच्यू ऑफ युनिटी, सद्द रण, अंबाजी, धारोई धरण, गिर अभयारण्य, द्वारकेला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल सरकारच्या दुसऱया कार्यकाळात अर्थमंत्री देसाई यांनी सलग दुसऱयांदा अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात गरीबांसाठीच्या योजना, पायाभूत सुविधा, कृषी अन् सेवा क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.









