दोनवेळा बसला होता हृदयविकाराचा धक्का
वृत्तसंस्था/ चेन्नई
दक्षिण आशियात पहिल्यांदाच एक अत्यंत अवघड मानली जाणारी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. रशियातून आलेल्या 3 वर्षीय चिमुरडय़ावर चेन्नईतील एमजीएम हेल्थकेयरच्या डॉक्टर्सनी सर्जिकल बायवेंट्रिक्युलर हार्ट इम्प्लाटेशनही ही शस्त्रक्रिया केली आहे. रुग्णालयात आणण्यापूर्वी या चिमुरडय़ाला दोनवेळा हृदयविकाराचा धक्का बसला होता.
लेव फेडोरेन्को नावाचा हा रशियन मुलगा हृदयाशी संबंधित ‘रिस्ट्रिक्टिव्ह कार्डियोमायोपॅथी’ या आजाराने ग्रस्त होता. शस्त्रक्रियेनंतर लेवच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. कार्डियॅक सायन्सेस डॉक्टर के.आर. बालकृष्णन यांच्या पथकाकडून शस्त्रक्रियेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या पथकात डॉक्टर सुरेश राव केजी, व्ही. श्रीनाथ, कार्डियक सर्जन एस. गणपती यांचा समावेश होता. डॉक्टर बालकृष्णन हे मेकॅनिकल सर्क्युलेटरी सपोर्ट प्रोग्राम आणि कार्डियक सायन्सेस अँड हार्ट लंग ट्रान्सप्लांटचे संचालक आहेत.









