केवळ 8 वर्षांत सोसायटीने घेतली गरुडझेप
प्रतिनिधी /येळ्ळूर
ग्राहकांची विश्वासार्हता जपल्यानंतर सोसायटीची प्रगती कशी होते, हे येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने दाखवून दिले आहे. केवळ 8 वर्षांत सोसायटीने जी गरुडझेप घेतली आहे, ती वाखणण्याजोगी आहे. 2021-22 सालामध्ये तब्बल 29 कोटी 73 लाख 81 हजारांची उलाढाल केली आहे. सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सोसायटीचे संस्थापक गोविंद काळसेकर यांनी ही माहिती दिली.
कोरोना काळातदेखील सोसायटीने आपली वाटचाल सुरूच ठेवली होती. लोकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सोसायटीकडे ग्राहकांचा ओढा वाढला. सर्वांनी पारदर्शकपणे व्यवहार चालविला. त्यामुळे सोसायटीने ही प्रगती साधल्याचेही गोविंद काळसेकर यांनी सांगितले. अवर्ग सभासदांना यावषी 8 टक्के लाभांश देखील जाहीर करण्यात आला आहे.
सध्या सोसायटीकडे 6 कोटी 36 लाख 90 हजार रुपयांच्या ठेवी, 2 कोटी 56 लाख 65 हजाराचे कर्ज वितरण केले आहे. सोसायटीकडे 12 लाख 81 हजारांचे भागभांडवल आहे. 20 लाख 83 हजारांचा राखीव निधी ठेवला आहे. सोसायटीचे संचालक बाळासाहेब पावले यांनीही यावेळी सर्व सभासद आणि कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले. सेपेटरी काजल करंबळकर यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. व्हा. चेअरमन प्रकाश सायनेकर यांनी ताळेबंद पत्रक, संचालक संजय मासेकर यांनी 2021-22 सालातील नफा विभागणी व संचालक बाळासाहेब कंग्राळकर यांनी 2022-23 सालाचे अंदाज पत्रक सादर केले. प्रारंभी चेअरमन जोतिबा काळसेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर दीपप्रज्वलन केले. सभेला संचालक नेताजी गोरल, पुंडलिक कंग्राळकर, संजय हुवाण्णावर, बसवंत लोहार, संचालिका शांता मासेकर, शालिनी देसाई, सल्लागार विष्णू मासेकर, बाळासाहेब देसाई, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनिता मेलगे व अपेक्षा काळसेकर यांनी केले. भुजंग कुंडेकर यांनी आभार मानले.









