प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोगामध्ये सन 2021-22 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण 28 आरोग्य वर्धनी केंद्रे (न.पा. 16 व मनपा 12) मंजूर केली आहेत. या केंद्रामध्ये 1 वैद्यकिय अधिकारी (एम.बी.बी.एस.), 1 स्टफ नर्स, 1 बहुउदेशिय आरोग्य कर्मचारी याप्रमाणे मुनष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्रांतर्गत बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर मात तपासणी, लसीकरण, नेत्र तपासणी व सर्व तपासण्या या मोफत स्वरुपात दिल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, 1 मे 2023 महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हयातील 28 आरोग्यवर्धनी केंद्रापैकी 6 नगरपालिका क्षेत्रात व 1 महानगरपालिका क्षेत्रामधील संस्थेचे रूपांतर, ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’मध्ये करण्याचे निर्णय घेणेत आलेला आहे. ‘आपला दवाखाना’ ची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यत असून सर्व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ च्या 142 केंद्रांचे उदघाटन डिजीटल माध्यमाव्दारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 मे 2023 सकाळी 10 वाजता उदघाटन होणार आहे. त्यानुसार कोल्हापूरमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ताराबाई पार्क येथील पितळी गणपतीशेजारील एम्पायर बिल्डींगमध्ये ‘आपला दवाखाना’चे उद्घाटन होणार आहे. तर पन्हाळा तालुक्यात जुनी पंचायत समिती इमारत, कागलमध्ये हुतात्मा तुकाराम हॉल, मुरगूड, गडहिंग्लज अंतर्गत लाखे नगर , शाहुवाडीमध्ये उचतनगर, शिरोळ तालुक्यात भैरेवाडी, कुरुंदवाड येथे इचलकरंजीअंतर्गत आसरानगर येथे दवाखाना सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









