संमेलन मराठी राजभाषा करावी असे विविध ठराव संमत
प्रतिनिधी /पेडणे
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या 28 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचा समारोपात मराठी राजभाषा करावी असे विविध ठराव संमत करण्यात आले आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या 28 व्या मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
सामारोप सत्रासाठी संमेलनाध्यक्ष विजय कापडी, सन्माननीय अतिथी सदानंद मोरे, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर व कार्याध्यक्ष राजमोहन शेटय़े उपस्थित होते.
संमेलन हे मराठीसाठी आशादायी असा योग : राजनमोहन शेटय़े
एक तापानंतर हे संमेलन झाले. ते साहित्य संमेलन आंबिये नगरीत हे संमेलन आज यशस्वी वसाकार झाले. ही आशादाय गोष्ट आहे.मराठीसाठी आशादायक असा हा योग आहे, असे राजमोहन शेटय़े म्हणाले.
पेडणे महाल हे कलेची खाण : रमेश वंसकर
रमेश वंसकर सर्वाच्या सहकार्याने हे संमेलन हे पेडणेत घडते आहे. संमेलन हे पेडणेच्या भुमित हे संमेलन आणि संत सोहिरोबाथ आंबियेया भूमित हे संमेलन झाले हे खूप मोठे भाग्य आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन विविधा साहित्य प्रकार आणि कला प्रकाराना या संमेलनात सहभाग घेताल्याबद्दल समाधान व्यक्त केले.हे संमेलन यापुढे दोन वर्षांनी न होता ते प्रत्येक वषी व्हावे अशी आशा व्यक्त केली. पेडणेच्या लोकांच्या उर्जा आणि प्रेणारा देणारे हे संमेलन आहे.संमेलनामध्ये अनेक साहित्यकि , कलाकार घडत आहे ही आनंददायी गोष्ट आहे. पेडणे महालात आणखीन एक संमेलन घडवूया असे सांगितले .
संमेलनाध्यक्ष विजय कापडी बोलताना म्हणाले, 28 वे संमेलन यशस्वी झाले आहे. आता 29 व्या संमेलनाची वाट पाहूया आणि गोड आठवणी बरोबर घेऊन जाऊया असे विजय कापडी म्हणाले.
यावेळी दुर्गाकुमार नावती यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. तसेच पार्सेकर यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. सूञसंचालन दुर्गाकुमार नावती तर आभार किशोर किनळेकर यांनी मानले.
स्पर्धांचे बक्षीस वितरण
बक्षीस वितरण : निबंध लेखन प्रथम आद्या गायतोंडे, द्वितीय पारितोषिक तन्मय खर्बे, तृतीय-साईश देऊलकर, उत्तेजनार्थ श्रेयस चव्हाण, जानवी आंबेकर.
उच्चमाध्यमिक विद्यार्थी निबंध स्पर्धा
प्रथम पारितोषिक-आकृती नाईक, द्वितीय कुशी चोडणकर तृतीय- सुकंन्या मयुरेश वाटवे. महाविद्यालयीन स्तर निबंध स्पर्धा – प्रथम गंगाराम परब , द्वितीय चंद्रकांत परब, तृतीय – विनोद नाईक या बक्षिसे प्राप्त विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी संमेलनासाठी योगदान तसेच सहकार्य केलेल्या मराठी भाषिक कार्यकर्ते यांचा गौरव करण्यात आले. यावेळी प्राध्यापक आनंद कोळंबकर यांचा गौरव डा?.सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रिया टांकसाळे यांचा डा?.सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोषाध्याक्ष चंद्रकांत सांगळे यांचा सत्कार करण्यात आला. विवेक सावंत यांचा गौरव डा?.सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
अशोक तहशीलदार, गजानन गवंडी, नवनीत वेर्णेकर, प्रभाकर नारुलकर, सुहास बेळेकर, साहिल कळंगुटकर, चंद्रकांत सावळ देसाई, किशोर किनळेकर, उमेश गाड, दत्ताराम मोपकर, रार् शेटगावकर, व्यंकटेश नाईक, महेश तिरोडकर, शांती किनळेकर, पुंडलीक पंडित, नारायण सावंत, अमोल आसोलकर, परेश परवार यांचा गौरव करण्यात आला. संमेलनात ज्ये÷ नाटय़ लेखक आणि पेडणेचे सुपुञ नाटय़ लेखक रमाकांत पायजी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचे नातेवाईक यांनी सत्कार स्वीकारला.
संमेलनात घेण्यात आलेले विविध ठराव
पेडणेचे सुपुञ कथाकार नारायण महाले, आमोरी हा गोवा विद्यापीठ समावि÷ म्हणून अभिनंदाचा ठराव मांडला. पेडणे तालुक्मयात रविंद्र भवन उभारण्याचा ठराव घेण्यात आला. गोवा राज्यात कोकणी भाषेबरोबरच मराठी भाषेला सरकारी कामकाजात स्थान द्यावे तसेच मराठी राजभाषा करावी. कोकणी भाषेलाजसे अनुदान देतात तसेच मराठी भाषेला द्यावे. ग्रंथ पडलेली ग्रथालयानापुर्जीवीत करावे असा ठराव बंद पडालेल्या शाळात ही वाचनालये ठराव घेण्यात आला.
समारोप सञानंतर ” तुका आकाशाएवढा ” हे मराठी संगीत नाटक श्री महालक्ष्मी युवक संघ तळवली फोंडा महिला गटातर्फे सादर करण्यात आले.









