पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या उरुळी कांचन परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करत 2750 लिटर गावठी दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक लोणीकाळभोर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना उरुळी कांचन परिसरातील शिंदेवणे काळेश्वर गावात राठोड वस्तीवर गावठी हातभट्टी दारु विकत असल्याची त्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून 3 लाख 2 हजारांचा 2750 लिटर गावठी दारूसाठा नष्ट केला. याप्रकरणी तिघांवर महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहेत.
अधिक वाचा : डुप्लिकेट शिवसेनेचे हे विधिमंडळ नव्हे चोरमंडळ









