भाजपा नेते निलेश राणे यांनी वेधले होते लक्ष
मालवण : प्रतिनिधी
बऱ्याच वर्षांची मागणी असलेल्या तसेच कणकवली व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या किर्लोस चव्हाणवाडी ते गोठणेमाळ होडीचे साने ग्रा. मा. ४५८ या रस्त्यावरील ब्रिज साठी नाबार्ड अंतर्गत २७ कोटी ५० लक्ष एवढा निधी मंजूर झाला असून यामुळे किर्लोस ते गोठणे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रवास करणे सोयीचे होणार आहे. किर्लोस व गोठणे रामगड पंचक्रोशीतील नागरिकांकडून अनेक वर्षापासून या ब्रिज साठी मागणी होत होती किर्लोस ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश निलेश राणे यांचे या विषयावर लक्ष वेधल्यानंतर निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी ते गोठनेमाळ मार्गे होडीचे साने ग्रा. मा. 458 किमी. 0/100 येथे नवीन पूल बांधणे या कामासाठी सत्तावीस कोटी पन्नास लक्ष एवढ्या निधीची मागणी केली होती, त्यानुसार निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. किर्लोस-गोठणे ब्रिजसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती श्री. सुनील घाडीगांवकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण घाडीगांवकर, सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश ऊर्फ गजू बाक्रे,श्री बाळा ऊर्फ अर्जुन लाड, श्री सतीश नलावडे, श्री प्रकाश भावे, तसेच भाजपचे सोशल मीडिया मालवण तालुका संयोजक शुभम बाक्रे तसेच भाजप युवा मोर्चाचे अभिमन्यू लाड व विनोद भावे.गोठणे सरपंच सौ. दीप्ती हाटले.यांनी केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.









