तुर्कियेतील 2,600 वर्षे जुन्या स्मारकाच्या ठिकाणी झालेल्या उत्खननात एक प्राचीन शिलालेख मिळाला आहे. या शिलालेखावरील मजकुराचा अर्थ समजल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्राचीन शिलालेखाच्या स्मारकाला अर्सलान काया (सिंहासारखा पर्वत) म्हटले जाते. या स्मारकावर सिंह आणि स्फिंक्सच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत अशी माहिती संशोधक मार्क मुन यांनी दिली आहे. प्राचीन तुर्कियेत इस्लामच्या आगमनापूर्वी कुठल्या प्रकारची पूजापद्धती प्रचलित होती हे संशोधकांनी या स्मारकावरील अध्ययनाद्वारे सांगितले आहे.
या शिलालेखात ‘मटेरन’ नावाचा उल्लेख आहे. मटेरन ही फ्रीजियन्सची एक देवी आहे. या देवीला सुमारे 1200 ते 600 ख्रिस्तपूर्वपर्यंत पुजले जात होते. पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीत प्राचीन युनानी इतिहास आणि पुरातत्व विभागाचे प्राध्यापक मार्क मुन यांनी या शिलालेखावर संशोधन केले आहे. मटेरन देवीला मातेच्या स्वरुपात ओळखले जात होते. तुर्कियेचे नव्हे तर अन्य प्राचीन संस्कृती देखील मटेरनचा सन्मान करत होत्या असे मार्क मुन यांनी सांगितले आहे.
युनानी लोक त्यांना देवतांची माता म्हणून ओळखत होते. रोमन त्यांना मॅग्ना मेटर म्हणजेच महान माता म्हणत होते. या स्मारकाची निर्मिती ज्या काळात करण्यात आली, त्या काळात लिडिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका राज्याचे या क्षेत्रावर शासन होते. ते देखील मेटेरनसाठी उच्च सन्मान बाळगून होते. स्मारकाची हवामान आणि लुटीमुळे मोठी हानी झाली आहे. अशा स्थितीत हा शिलालेख वाचणे कठिण असल्याचे मार्क मुन यांनी म्हटले आहे.
शिलालेखाची 25 एप्रिल 2024 रोजी तीव्र प्रकाशात छायाचित्रे काढण्यात आली होती आणि त्यावर अध्ययन करण्यात आले. स्मारकावर मटेरन नाव असेल हे समजते, कारण यात देवीची एक प्रतिमा देखील आहे. मेटेरेन नाव मोठ्या शिलालेखचा हिस्सा राहिला असेल, ज्यात शिलालेख कुणी तयार करविला होता आणि मटेरन कोण होते हे नमूद आहे असे मुन यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी स्मारकाच्या शैलीच्या तपशीलांची पडताळणी केली, जे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील शिलालेखाच्या कालावधीशी संबंधित आहे.









