प्रवाशांची संख्या पोहचणार 40 कोटींवर: नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात हवाई प्रवाशांची संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आगामी काळात 26 नवीन विमानतळांची बांधणी केली जाईल. कारण, येत्या 5 वर्षांत हवाई प्रवाशांची संख्या 40 कोटींच्या पुढे जाणार आहे. दरम्यान, या वर्षी 15 नवीन उ•ाण प्रशिक्षण संस्था सुऊ करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत विमान कंपन्यांकडे येत्या पाच ते सात वर्षांत सुमारे 2,000 विमानांचा ताफा असणे अपेक्षित असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एव्हिएशन कन्सल्टन्सी सीएपीए समिटमध्ये म्हटले आहे.
मंत्री सिंधिया यांनी सांगितले की, भारताने एरोस्पेस उत्पादनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. येत्या पाच ते सात वर्षांत देशांतर्गत विमान कंपन्यांकडे सुमारे 2,000 विमानांचा ताफा असणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
15 फ्लाइंग ट्रेनिंग
ऑर्गनायझेशनची स्थापना केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, या वर्षाच्या अखेरीस 15 फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनची स्थापना केली जाण्याची अपेक्षा आहे, एफटीओची एकूण संख्या 50 वर नेणार आहे, जी सध्या 35 आहे. ते म्हणाले की प्रवाशांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार, एकूण हवाई प्रवाशांची संख्या आधीच 10 कोटी ओलांडली आहे, जी पुढील 5 वर्षांत 40 कोटींच्या पुढे जाणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.









