लेखक- गीतकार जावेद अख्तर (Jawed Akhtar) जे आपल्या वक्तव्यावरून भारतात अनेकदा ट्रोल झाले होते, त्यांनी दहशतवादावर आणि तेही पाकिस्तानमध्ये (Pakistan) जाऊन लाहोरमध्ये पाकिस्तानलाच खडसावले आहे. भारताने अनेक तक्रारी करूनही 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत असल्याचा आरोप केला.
प्रसिद्ध उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जावेद अख्तर सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. लाहोरमध्ये बोलताना त्यांना एक विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे.
मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची आठवण करून देताना जावेद अख्तर म्हणाले, “मुंबईवर कशा प्रकारे हल्ला झाला ते सर्वांनी पाहिले आहे… ते दहशतवादी अजूनही तुमच्या देशात (पाकिस्तान) मुक्तपणे फिरत आहेत.” नुसरत फतेह अली खान आणि मेहंदी हसन या पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताने मोठे कार्यक्रम आयोजित केले तरीही पाकिस्तानने लता मंगेशकर यांच्यासाठी कधीही कार्यक्रम आयोजित केला नाही. असाही आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “आपण एकमेकांवर आरोप करू नयेत. त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईवर कसा हल्ला झाला ते आपण पाहिलं. ते दहशतवादी ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून. ते अजूनही तुमच्या देशात मुक्तपणे फिरत आहेत. त्याविरोधात भारतीयांनी तक्रारही केली आहे.” असा हल्लाबोल त्यांनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








