कामगार संघटनांच्या बैठकीत निर्धार
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगीकरणासोबत शेतकरीविरोधी कायदे करणाऱया केंद्र सरकारविरोधात देशातील 10 कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप सहभागी होऊन यशस्वी करावा, असे आवाहन आयटकचे जिल्हा अध्यक्ष ऍड. नागेश सातेरी यांनी केले.
विविध कामगार संघटनांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सिटूचे गौरवाध्यक्ष सी. ए. खराडे होते. बैठकीला वायव्य परिवहन मंडळ, पंचायत कामगार, अंगणवाडी, मध्यान्ह आहार कामगार, बांधकाम कामगार, किसान सभेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सीटूचे जिल्हा सेपेटरी गयबो जैनेखान, दिलीप वारके, एल. एस. नाईक, सी. ए. बिदनाळ, यल्लुबाई शिगेहळ्ळी, जी. बी. कुलकर्णी यांच्यासह इतरांनी संप यशस्वी करण्याचा निर्धार केला.









