एकूण 600 तारांकीत तर 1900 अतारांकीत प्रश्न : उद्यापासून होणार प्रारंभ, अठरा दिवसांचे कामकाज
पणजी : उद्या मंगळवार दि. 18 जुलैपासून गोवा राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून ते 18 दिवस चालणार आहे. हे अधिवेशन 18 दिवस चालणार आहे. सरकार अ]िण विरोधी पक्ष अशा दोघांची कसोटी त्यात लागणार असून विविध प्रश्न, विषय यावऊन अधिवेशन गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून त्यासाठी अंदाजे 2500 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याशिवाय सरकारी व खासगी विधेयके, लक्षवेधी सूचना, खासगी ठराव अशा प्रकारचे विविध कामकाज होणार आहे. अंदाजे 600 प्रश्न तारांकीत आहेत तर 1900 प्रश्न अतारांकीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मागील अधिवेशनास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प मांडला होता. त्यावरील चर्चा आताच्या या पावसाळी अधिवेशनात होणार आहे. ती चर्चा त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्याचे आधी ठरले होते परंतू त्यात वेळ कमी असल्याने सदर चर्चा पावसाळी अधिवेशनात कऊ या अशी मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली होती. मागील अधिवेशनात राज्यपालांच्या अधिभाषणावर चर्चा झाली होती. दरदिवशी सकाळी 11.30 वाजता अधिवेशन प्रश्नोत्तर तासाने सुरू होणार असून त्यानंतर शून्य तास व इतर ठरलेले कामकाज होणार आहे. विरोधी पक्षीय आमदारांनी विविध ज्वलंत प्रश्नांवरील विषय विधानसभेत काढण्याचे ठरविले असून सरकारला नामोहरम करण्याचे ठरविले आहे. काँग्रेस, आरजी, आप व गोवा फॉरवर्ड अशा पक्षांचे 7 आमदार एकत्र आले असून त्यांनी एकसंध राहून सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचे ठरविले आहे.
विविध प्रश्नांवरुन होणार खडाजंगी
या अधिवेशनात म्हादई, अबकारी कर घोटाळा, इतर अनेक घोटाळे, जमीन बळकावप्रकरण इत्यादी विषयांवर आमदारांनी प्रश्न विचारले असून विरोधी आमदारांनी सरकारला घेरण्याचे निश्चित केले आहे. सरकारने देखील त्यास उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, खडाजंगी होणार, अशी चिन्हे दिसत आहेत.









