बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या पुढाकाराने श्रद्धा ताडे यांच्या उपचारासाठी 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात मंगेश चिवटे यांनी बेळगावच्या केएलई हॉस्पिटलला धावती भेट दिली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व माजी महापौर मालोजीराव अष्टेकर व खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्यासोबत हॉस्पिटलमधल्या ऊग्णांच्या अडचणी जाणून घेऊन विचारपूस केली. दरम्यान श्रद्धा ताडे यांना तातडीने मदतीची गरज असल्याचे समजले. चिवटे यांनी हॉस्पिटलचे पीआरओ शंकर व तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून माहिती घेतली. त्यानंतर श्र्रद्धा ताडे यांचा अर्ज करून घेऊन एक विशेष पातळीवरती तो अर्ज मंजूर करण्यासाठी सांगितले. जवळपास अंदाजे 40,000 ऊपये शस्त्रक्रियेसाठी खर्च होता. त्यांचा अर्ज स्वीकारून अल्पावधीत अर्ज मंजूर करण्यात आला. त्याच मंजुरीचे पत्र म. ए. समितीच्या नेते मंडळींना पाठवण्यात आले. ऊग्णांच्या नातेवाईकांना सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी समितीचे पदाधिकारी मालोजी अष्टेकर व रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते त्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले व पुन्हा एकदा त्या ऊग्णाची चौकशी केले. याप्रसंगी आनंद आपटेकर, प्रशांत भातकांडे व अनंत पाटील उपस्थित होते.
Previous Articleग्रामसेवकांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याबाबत कार्यवाही सुरु
Next Article राखी पाठविण्यासाठीच्या कव्हरचा तुटवडा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









