सावंतवाडीत 25 शिक्षकांचा सत्कार
सावंतवाडी : प्रतिनिधी
शिक्षक संघटना व शिक्षक सध्या आंदोलनात्मक भूमिका घेत आहेत. खरतर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत राहायला हवे . मी शिक्षण मंत्री झाल्यापासून शिक्षकांच्या सर्व समस्या अडचणी दूर करत आलो आहे. असे असताना जर शिक्षक कुठल्या आंदोलनात किंवा कुठलीही वेगळी भूमिका घेत असतील तर मी गप्प बसणार नाही. राज्यातील शिक्षकांसाठी मी वेतनवाढ तसेच विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान अशा सर्व सुविधा त्यांना उपलब्ध करून दिले आहेत, आता लवकरच प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक भरतीही केली जाणार आहे. मुलांचे भवितव्य माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी जे जे शिक्षण विभागात काही निर्णय घेता येतील ते मी निर्णय घेणार आहे. आणि त्यात जर कोणी आडवा येत असेल तर मी स्वस्त बसणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक अत्यंत दर्जेदार असे काम करत आहेत. असे कौतुकही त्यांनी केले. असे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी गुरु सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात स्पष्ट केले. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आमदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने गुरु सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा 2023 चा कार्यक्रम आज करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 25 प्राथमिक ,माध्यमिक आदर्श शिक्षकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर मित्रमंडळाचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भरत गावडे, विठ्ठल कदम ,गजानन नाटेकर ,प्रतीक बांदेकर, गणेश प्रसाद गवस ,प्रा. रुपेश पाटील, आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या सुषमा मांजरेकर, म. ल . देसाई ,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के आधी उपस्थित होते . यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक ,माध्यमिक 25 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.









