ऑनलाईन टीम / तरुण भारत :
25 nominations for Andheri East by-election शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, प्रमुख लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल यांच्याविरोधात होणार आहे.
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सावध पवित्रा घेत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबतच संदीप नाईक यांनीही उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख 14 ऑक्टोबर होती. या जागेसाठी एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 8 अपक्ष असून, इतर छोटय़ा-मोठय़ा संघटनांचे आहेत. आज या एकूण उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 3 नोव्हेंबरला या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून 6 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
अधिक वाचा : चेन्नई-बेंगळूर-म्हैसूर मार्गावर धावणार पाचवी वंदे भारत ट्रेन
‘या’ उमेदवारांनी दाखल केले अर्ज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि संदीप नाईक भाजपकडून मुरजी पटेल, संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), मनोज नायक (राईट टू रिकॉल), निखिलकुमार ठक्कर (अपक्ष), चंद्रकांत मोटे (अपक्ष), अर्जुन मुरडकर (अपक्ष), मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी), चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना), आकाश नायक (भारत जनाधार पार्टी), राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना), निकोलस अलोदा (अपक्ष), साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना), अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी / अपक्ष), बाळा विनायक (आपली अपनी पार्टी), (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) वाहिद खान (अपक्ष), निर्मल नागबतूला (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष).








