कोल्हापूर
राशिवडे येथील चंदर सदाशिव ताडे यांच्या शेतातुन सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या पंचवीस बकऱ्यांची चोरी मंगळवारी रात्री झाल्याची तक्रार युवराज बाळु जोंग यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबतची माहीती अशी की,जोंग यांची बकरी चंदर ताडे यांच्या शेतामध्ये बसविण्यात आली होती.मंगळवारी रात्री यामधील अडीच लाख रुपये किंमतीच्या पंचवीस बकऱ्यांची चोरी झाली.ही घटना बुधवारी सकाळी लक्षात आल्यानंतर शोधाशोध केली.परंतु बकरी आढळुन न आल्याने राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.अधिक तपास पो.काॅ.कॄष्णात खामकर करीत आहेत.








