वृत्तसंस्था/मथुरा
मथुरेतील वृंदावन रेल्वे ब्लॉकवर मालगाडी ऊळावरून घसरली. 25 हून अधिक डबे ऊळावरून घसरले. या अपघातादरम्यान कपलिंग तुटल्याने वॅगन्स एकमेकांवर आदळल्या. या मालगाडीतून कोळशाची वाहतूक केली जात होती. साहजिकच मालडबे कलंडल्यामुळे डाऊन आणि अप लाईनवर कोळशाचे ढीग साचले. त्यानंतर दिल्ली-मथुरा ट्रॅक विस्कळीत झाला. या अपघातामुळे 20 हून अधिक गाड्या प्रभावित झाल्या आहेत. आग्रा विभागातील 12 गाड्या गाझियाबादच्या दिशेने वळवण्यात आल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीआरएम आणि रेल्वे अधिकारी बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.









