कुंभोज वार्ताहर
हिंगणगाव तालुका हातकलंगले येथील म्हसोबा मंदिर शेजारी 25 एकर ऊसाच्या फडाला आग लागुन शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर अचानक लागलेल्या आगीमुळे आग विझवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला परंतु आगीने रुद्ररूप धारण केल्याने, आग भिजवणे अवघड होते. हाता तोंडाला आलेले पीक हातातून गेल्यामुळे ऊस शेतकऱ्यांच्यातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत होती परिणामी साखर कारखान्यांनी विना कपात कोणत्याही अटीशिवाय सदर ऊस तोडून घ्यावा अशी मागणी सदर परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
सदर जाळीत सर्व उसाची नोंद शरद सहकारी साखर कारखान्याला असून सदर ऊस जळीताची माहिती कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आली आहे सदर ऊसजळीतामध्ये शेतकरी , आनंदा मेटकर, सलीम मुजावर, भरत पाटील, अण्णाप्पा वाटारे, शिवगोंडा पाटील, मनोहर पाटील, हिंदुस्तान पाटील अजित पाटील, महावीर पाटील मनोहर पाटील, सुकुमार देसाई, मलकारी बंडगर, माळाप्पा मेटकर तानाजी मेटकर, शांतिनाथ रत्नपारखे, बाबासाहेब नायकवडी, माळू धनगर, शिवाजी बंडगर, किरण पाटील दत्तू पाटील, आधी शेतकऱ्यांचा समावेश आहे.