नवी दिल्ली
हिंडाल्को इंडस्ट्रीज या जगातील सर्वात मोठ्या अॅल्युमिनियम कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत 2454 कोटी रुपयांचा एकत्रित नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता कंपनीच्या एकत्रित नफ्यामध्ये 41 टक्के घट झाली आहे. आदित्य बिर्ला समूहांतर्गत कार्यरत असणाऱ्या कंपनीने दुसरीकडे जून तिमाहीअखेर 52,991 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. सदरच्या तिमाहीत हिंडाल्कोने धातूच्या विक्रीमध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली आहे.









