त्रिपूरा राज्यातून आसाममध्ये ट्रकमधून तस्करी होताना २४०० किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. ही करवाई शनिवारी रात्री आसाम-त्रिपुरा सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “आसाम-त्रिपुरा सीमेवर चुराईबारी वॉच पोस्टच्या अधिकार्यांनी शेजारील राज्यातून येणारा ट्रक पकडून २४०० किलो गांजा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना पकडण्यात आले आहे.” मुख्यमंत्री सरमा यांनी ही माहिती आपल्या ट्विटर हँडलद्वारे दिली.”आसाममधून पूर्वीपासून ईशान्येकडील प्रदेशांतून येणार्या अंमली पदार्थांच्या तस्करी होते. इतर देशातून भारताच्या इतर भागांत तस्करी केली जाते परंतु अलिकडच्या वर्षांत परिस्थिती बदलली आहे.” असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









